लातूरमध्ये घरफोडी करून चोरट्याने 64 हजार रुपयांचा ऐवज पळवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर शहरातील केशवनगर भागातील एका घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण 64 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अरविंद दिगंबर भारती (रा. काडगाव ता. लातूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार हे 29 मे रोजी केशवनगर येथील घराच्या दाराला कुलूप लावून कामावर गेले असता दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटा घरात शिरला आणि त्याने रोख रक्कम 20 हजार रुपयांसह  सोन्याचे 17 ग्रॅमचे दागिने असा एकूण 64 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.