
शिरूर ताजबंदमधील महेश विद्यालयाच्या बाजूला असलेल्या भगीरथ किशनलाल भुतडा यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून घरातील 3 ते 4 जणांना मारहाण केली आहे. तसेच शस्त्रांचा धाक दाखवत दोन महिला व एक पुरुष यांच्या अंगावरील सोन्याच्या 7 अंगठ्या, सोन्याच्या 7 बांगड्या, 3 लॉकेट, 1 ब्रासलेट असे एकूण 22 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 मोबाइल असा 5 लाख 42 हजार 500 रूपयांचा ऐवज लांबवत चोरटे पसार झाले आहेत. शनिवारी पहाटे 3.30 ते 4.30 च्या वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
हे चोर शिवकृपा कॉलनीत रामासाने यांच्या घरी गेले. तेथील सर्व पाहणी करून तेथील लॉक तुटत नसल्याने ते पुन्हा त्याच कॉलनीतील भगीरथ भुतडा व ओमकार स्वामी यांच्या घरी गेले. ओमकार स्वामी इथे राहत नसल्यामुळे त्यांच्या घरातील काहीही चोरीला गेले नसल्याची माहिती ओमकार स्वामी यांनी दिली.
भागीरथ भुतडा यांच्या घराच्या गेटचे कुलुप तोडून चोरटे दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या घरी गेले. तेथील त्यांच्या नातेवाईकांना तक्रारदारांच्या आईवडिलांना धाक दाखवून सोने व मोबाईल घेवून चोरटे पसार झाले. चोरट्यांना पाहून तक्रारदाराच्या पत्नीने आरडाओरडा केल्यामुळे चोरटे पसार झाले. गल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जिन्स पॅन्ट व जरकिन घातलेले चोरटे दिसत आहेत. त्यांच्या तोंडाला मास्क असून डोक्यावर टोपी आहे. एकूण चार चोरटे असल्याचे तक्रादरांनी सांगितले. त्यानुसार अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या चोरीचा तपास लावणे हे पोलिसांपुढे आव्हान आहे.




























































