
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध महिनाभर सुरू आहे. तसेच या युद्धाची तीव्रता वाढत आहे. आता अमेरिका इराकमध्ये सैन्य उतरवण्याच्या तयारीत आहे. या जागतिक अनिश्चिततेच्या काळात “रिच डॅड, पुअर डॅड” चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गंभीर इशारा देत लोकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हे युद्ध लवकर संपणार नाही, त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करा आणि हाच निश्चिंत होण्याचा एकमेव मार्ग आहे, असे कियोसाकी म्हणाले.
रॉबर्ट कियोसाकी यांनी श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून पुन्हा एकदा सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी आखाती युद्धाबद्दल एक गंभीर इशाराही दिला आहे. अमेरिका-इराण युद्ध सुरू आहे. तेल आणि वायूचे संकट अधिक गडद झाले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने, अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलपासून ते दैनंदिन वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यान, शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार होत आहेत.
या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर,रॉबर्ट कियोसाकी यांनी आता एक्सवर एक पोस्ट टाकली आहे, ज्यात त्यांनी आर्थिक संकटाच्या काळातही श्रीमंत होण्याचे रहस्य उघड केले आहे. त्यांची एक्स-पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, जर तुम्हाला एक श्रीमंत गुंतवणूकदार व्हायचे असेल, तर तुम्हाला भविष्याचा विचार करावा लागेल, आणि हे दोन कारणांमुळे खूप सोपे झाले आहे, असे ते म्हणाले.
पहिले कारण म्हणजे राष्ट्रीय कर्ज वाढतच राहील कारण सरकारे बनावट नोटा छापतच राहतील. याचा अर्थ महागाई वाढतच राहील आणि ज्यांच्याकडे अमेरिकन डॉलर आहेत त्यांना त्रास सहन करावा लागेल. दुसरे कारण म्हणजे इराणमधील सुरू असलेले युद्ध कधीही संपणार नाही आणि हे स्पष्ट आहे की यामुळे तेलाच्या किमती वाढतील, ज्यामुळे महागाई आणखी वाढेल. मी अनेक वर्षांपासून सांगत आलो आहे की, पैसे वाचवा आणि दीर्घकाळासाठी स्टॉक्स, बॉण्ड्स, म्युच्युअल फंड आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करा. एक सु-विविध पोर्टफोलिओ तयार करा. अमेरिकन बॉण्ड्स सुरक्षित आहेत ही सर्वात मोठी खोटी गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.
Clarifying last X post.
Does a college degree mean safety?
Does a steady job mean safety?
Does money in the bank mean you are rich?
Does a 401k mean future financial security?
Can the PhDs in government payoff our national debt?
Only you can answer those questions.— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) March 30, 2026
संकटाच्या काळात केवळ सोने आणि चांदी हाच एक सुरक्षित पर्याय आहे. महागाई आणि आर्थिक संकटाबद्दल इशारा देताना रॉबर्ट कियोसाकी यांनी सोनेचांदी खरेदीचा सल्ला दिला. माझ्या मते, खरे सोने, खरी चांदी, तेल, बिटकॉइन आणि इथेरियम या २०२६ साठी सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहेत. मी जे सांगतो त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका; तुमच्यासाठी काय खरे आहे हे तुम्ही स्वतः ठरवा. काळजी घ्या. कियोसाकीची सोमवारी केलेली ही पोस्ट वेगाने व्हायरल होत असून, शेअर केल्यापासून तिला ८००,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

























































