भाजप कार्यकर्त्यांची ‘मोदी… मोदी…’ घोषणाबाजी, रॉबर्ट वढेरा म्हणाले ‘अपना टाइम आयेगा!’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
robert-vadra

सामना प्रतिनिधी, मुंबई

राजकारणावर बोलण्याचा मी प्रयत्न करीत आहे. पण त्यासाठी अजून शिकत आहे. पण शिकल्यानंतर माझीदेखील वेळ येईल, असे सूचक विधान काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी केले. रॉबर्ट वढेरा यांनी आज मुंबादेवीचे दर्शन घेतले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांनी हे विधान केले.

रॉबर्ट वढेरा यांनी मुंबादेवीचे दर्शन घेतले त्यावेळी तिथे भाजप कार्यकर्ते जमले होते. त्यांच्यासमोर जोरदार घेषणाबाजी केली. याबाबत त्यावेळी त्यांनी न्यूज चॅनेलसमोर कोणतेही मत व्यक्त केले नाही, मात्र त्यानंतर वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले म्हणणे मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना विचारले असता वढेरा म्हणाले, राजकारणात काही मर्यादा पाळायला हव्यात. आपण जे फेसबुकवर मत व्यक्त केले. शहीदांविषयी मला आपले म्हणणे मांडावेस वाटलं म्हणून. माझ्या पत्नीच्या कुटुंबाने देशासाठी आयुष्य दिले आहे. प्रियंका, राहुल यांच्या रक्तातच देशसेका आहे. बदल व्हावा असे त्यांनाही काटत असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायासाठी न्यायालयात जाणार
आपण न्यायालयापेक्षा मोठे नाही. न्यायालयानेही व्यवस्थित चौकशी केल्यानंतर योग्य निर्णय दिला आहे. कायद्याचा आदर केला पाहिजे. मी कायद्यावर विश्वास ठेवतो. न्याय मागण्यासाठी मी न्यायालयात जाणार. कारण तिथे न्याय मिळेल यावर माझा विश्वास आहे. माझ्यावर इतके आरोप करण्यात आले, पण एकही गोष्ट सिद्ध झालेली नाही. नुसते आरोप करण्यात आले असे त्यांनी सांगितले.

नात्यांचा गैरवापर केला नाही!
मी सगळय़ांचा आदर करतो. मी कोणत्याही पदावर नाही. मी नात्यांचा चुकीचा वापर केलेला नाही. पण माझ्या नात्यांवर भाष्य करत त्यांचा कापर केला जात आहे. पण मी नेहमी लढत राहणार. तुम्ही पाच वर्षांत मला इतका त्रास दिलात, पण आजही मी येथे आहे. माझ्या मुलांनाही त्रास झाला. कितीही त्रास दिलात तरी मी ठाम राहणार आहे, असे रॉबर्ट वढेरा यांनी म्हटले.