रोहित-विराटमध्ये दरार? कसोटीतून वगळले, सोशल साटइवर अनफॉलो

11

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सपाटून मार खावा लागलाय. क्रिकेटच्या रणांगणात निराशाजनक कामगिरी करणार्‍या टीम इंडियाचा पाय आणखीन एका घटनेने खोलात जाण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आगामी आशिया कपसाठी टीम इंडियाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा यांच्यामध्ये दरार निर्माण झाल्याचे सोशल नेटवर्किंग साइटवर दिसून येत आहे. दोघांमधील वितुष्टाची बातमी इंटरनेटद्वारे पसरू लागल्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याचसोबत दोघांमधील ‘दरार’ हिंदुस्थानी क्रिकेटसाठी हानिकारक असल्याचा सूर उमटू लागला आहे.

 

रोहित शर्मा याने विराट कोहलीला ट्विटर व इन्स्टाग्राम या सोशल साटइवर अनफॉलो केले आहे. मुंबईच्या या खेळाडूने विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिलाही अनफॉलो केले आहे. त्यानंतर विराट कोहलीकडून रोहित शर्माला अनफॉलो करण्यात आले. यामुळे दोघांमध्ये काही तरी बिनसले असल्याची चर्चा रंगू लागली.

 

दरम्यान, इंग्लंडमधील अखेरच्या दोन कसोटींसाठी टीम इंडियामध्ये पृथ्वी शॉ व हनुमा विहारी या दोघांना संधी देण्यात आली. यावेळी रोहित शर्माच्या नावाचा विचार या दोन कसोटींसाठीही करण्यात आलेला नाही. यामुळे नाराज झालेल्या रोहित शर्माने विराट कोहलीला अनफॉलो केल्याचे वृत्त मीडियामधून प्रसिद्ध करण्यात येत आहे.  

शास्त्री, कोहलीविरुद्ध खेळाडूंचे बंड 

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर संघातील इतर खेळाडू नाराज असल्याचे वृत्त इंग्रजी वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध झाले आहे. विराट कोहली प्रत्येक सामन्यात बदल करत असतो.  त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास ढासळतो. संघातील स्थानच पक्के नसेल तर खेळाडू कामगिरीत सुधारणा कशी करील अशाप्रकारची तक्रार खेळाडूंकडून करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या