
साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापण्यात भाजपचा हात कुणीही धरणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच 2029 मध्ये मित्रपक्षांना संपवून भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असे भाकीतही रोहित पवार यांनी केले.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले की, साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापण्यात भाजपचा हात कुणीही धरणार नाही. याच अनुषंगाने कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात उभा करण्यासाठी भाजपने आपल्या निष्ठावंतांना अंगावरील माशी झटकावी तसं बाजूला सारलं आणि आगामी उमेदवार म्हणून प्रज्ञाताईंना पक्षात प्रवेश दिला. यावरून 2029 मध्ये मित्रपक्षांना संपवून भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, हे मी अनेकदा केलेलं भाकित हळूहळू सत्यात उतरताना दिसतंय.
बाकी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रज्ञाताई सातव यांचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या या निर्णयाने स्व. राजीव जी सातव यांच्या आत्म्यास नक्कीच दुःख झालं असेल असेही रोहित पवार म्हणाले.
साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापण्यात भाजपचा हात कुणीही धरणार नाही. याच अनुषंगाने कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात उभा करण्यासाठी भाजपाने आपल्या निष्ठावंतांना अंगावरील माशी झटकावी तसं बाजूला सारलं आणि आगामी उमेदवार म्हणून प्रज्ञाताईंना पक्षात… pic.twitter.com/FZJZLr3JFG
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 18, 2025



























































