
अजितदादांच्या अपघाती निधनापूर्वी त्यांच्या बारामती, काटेवाडी आणि मुंबईतील निवासस्थानाबरोबर काळी जादू करण्यात आली होती. बारामतीतील एक नेता भोंदू खरातच्या संपर्कात होता. पवार कुटुंबावर लवकरच मोठा आघात होणार आहे, असे खरातने बारामतीतील एका शेतकऱयाला सांगितले होते, असा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार म्हणाले, ‘मी आज तिसऱयांदा सीआयडी कार्यालयात गेलो, पण एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नाही. मला तिथे असलेल्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढावे लागले. सरकार आणि तपास यंत्रणा या प्रकरणाला गांभीर्याने घेत नसल्याचेच हे लक्षण आहे. पुढच्या वेळी मला सुरक्षारक्षकाशी संवाद साधावा लागेल, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, भोंदू खरात याच्या बँकखात्यात 27 ते 29 जानेवारीला अचानक मोठी आर्थिक उलाढाल का झाली? बारामतीमधील एक छोटा राजकीय नेता सातत्याने खरातच्या संपका&त होता. संबंधित नेत्याचे इतर मोठय़ा नेत्यांशी आर्थिक संबंध असून, त्यानेच हे सर्व रॅकेट चालवल्याचा संशय आहे,’ असे पवार यांनी नमूद केले.
अपघाताच्या दिवशी विमान पंपनीचा मालक सिंगच्या खात्यात 9 कोटी जमा
अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी विमान कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याच्या खात्यात 9 कोटी 81 लाख रुपये देण्यात आले. तर अंत्यविधीच्या दिवशी त्याच्या खात्यात 16 कोटी 88 लाख रुपये हस्तांतरित केले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अपघातापासून आतापर्यंत व्ही.एस.आर. कंपनीला तब्बल 145 कोटी रुपये मिळाले असल्याचे पवार यांनी सांगितले.

























































