मनरेगाच्या धर्तीवर केंद्रीय अर्थसंकल्पात शहरी रोजगार हमी योजनेची गरज, रोहित पवार यांची फेसबुककर पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त पुरोगामी आघाडी काळातील सरकारच्या अपयशाचे जीवंत स्मारक म्हणून हिणवली गेलेली मनरेगा योजना आजच्या कोरोनाच्या कठीण काळात देशाला खराखुरा आधारस्तंभ ठरला आहे. त्यामुळे येणा-या अर्थसंकल्पात मनरेगाच्या धर्तीवर शहरी रोजगार हमी योजना अर्थमंत्री सादर करतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाने संपूर्ण जगभरात आरोग्याच्या संकटासह अभूतपूर्व असे आर्थिक संकट देखील आणले आहे. संकट कुठलेही असो संकटाचा सर्वाधिक फटका बसतो तो समाजातील दुर्बल घटकांना. कोरोनाचे आर्थिक परिणाम बघिलते असता सर्वाधिक फटका हा समाजातील दुर्बल घटकांना बसलेला दिसतो, त्यातल्या त्यात महिलांना आणि शहरी भागातील असंघटित क्षेत्राला अधिक फटका बसला आहे. त्यामुळे पिढीजात गरिबीच्या चक्रव्यूहात अडकत चाललेल्या शहरी भागातील असंघटित वर्गासाठी केंद्र सरकार नक्कीच विचार करत असेल असे रोहित पवार यांनी नमूद केले आहे.