
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवरून महाराष्ट्रात संशयाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताची टाईमलाईन पत्रकारांसमोर मांडत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. इस्रायलची मोसाद हेर संस्था ज्या पद्धतीने आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी हातखंडे वापरते तशा पद्धतीने अजितदादांचा घातपात केला गेला असा जाहीर आरोप रोहित पवार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दादांचा दौरा अचानक का बदलला? विमानाची वेळ का बदलली गेली? पायलट का बदलले? विमान उतरविण्यासाठी बारामती विमानतळावरील 29 क्रमांकाची धावपट्टी सुरक्षित असतानाही 11 क्रमाकांच्या काहीशा धोकादायक धावपट्टीचा आग्रह का धरण्यात आला, या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणाची चौकशी त्रयस्थ परदेशी तपास संस्थांकडून केली जावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
तब्बल 1 तास 46 मिनीटांच्या पत्रकार परिषदेत रोहीत पवार यांनी विमानाची तांत्रिक स्थिती, अपघाताच्या आदल्या दिवशी घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देत अजितदादांच्या अपघाती मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राईज अँड कील फर्स्ट पुस्तकातील कटाचा दाखला देत ‘मोसाद’ पद्धतीने हा घातपात असल्याचे असल्याचे रोहीत पवार म्हणाले. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही पॅमेर्यात पैद झालेल्या चित्रणामुळे या अपघाताचे गांभीर्य समोर आले आहे. जर हे फुटेज नसते तर हा एक सामान्य अपघात म्हणून दुर्लक्षित केला गेला असता. एका प्रत्यक्षदर्शी महिलेच्या सांगण्यानुसार, अपघातापूर्वी विमानाचा आवाज अत्यंत वेगळा आणि संशयास्पद येत होता, असे रोहित पवारांनी नमूद केले.
व्हीएसआर कंपनीची चौकशी करा
व्हीएसआर विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. कंपनीत चेकलिस्ट पद्धत नसणे, कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर बंद असणे, मेंटेनन्समध्ये त्रुटी, पायलटना दोन उड्डाणादरम्यान पुरेसा आराम न देता पुढच्या प्रवासासाठी दबाव, विमानांतील स्टॉल वार्ंनग सिस्टीम बंद असणे, इंधन बचतीसाठी घाई करणे अशा बाबींची चौकशी व्हावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. दादांचे विमान चालवण्यापूर्वी पायलट सुमित कपूर हे हॉंगकॉंगवरून विमान उड्डाण करून आले होते. त्यांना आरामाला वेळ न देता कंपनीने अजितदादांच्या विमानावर पाठवले. ते विमान अजितदादांना बारामतीला सोडल्यानंतर बिहारपर्यंत प्रवास करणार होते आणि सुरतहून प्रवास करून आले होते, असे रोहित पवार यांनी सांगितले. व्हीएसआर कंपनी त्यासंदर्भातील रेकॉर्डही नीट ठेवत नाही, असे ते म्हणाले.
दादा घड्याळ नेहमी 15 मिनिटे पुढे ठेवत
दादा गेल्याचे अनेक दिवस आपल्या मनालाही पटत नव्हते. पण अपघातानंतर मिळालेल्या काही वस्तू प्रत्यक्ष पाहिल्या तेव्हा वास्तव समोर आले. जळलेला स्वेटर, चप्पल आणि अजितदादांच्या हातातील घड्याळ आपण पाहिले. दादा त्यांचे घडयाळ नेहमी 15 मिनिटे पुढे ठेवत असत. त्या घडयाळात 9 वाजलेले होते आणि ते पूर्णपणे बंद पडले होते. ते दृश्य पाहून आपल्याला खात्री पटली की अजितदादा हयात नाहीत, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न
- दादांच्या विमानाने दुसरा गो अराऊंड का घेतला नाही? कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का? कुणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणे महत्त्वाचं होतं का?
- टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची पाहणी झाली होती का? विमानाचा टेकलॉग कुठे आहे? एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहे?
- व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण भारतात यावर काहीच कारवाई का करण्यात आली नाही?
- या आधी व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. पण त्यावर पुढे काहीही तपास झाला नाही. दोन वर्षांपासून त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आला का?
- या विमान अपघातामुळे ‘व्हीएसआर’ कंपनीच्या कारभाराबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. यामध्ये हेवी बेस्ट मेंटेनन्स नक्की कुठे केले जाते, याची माहिती नाही.
- पायलट वेळेत आले असताना उड्डाण उशिरा का करण्यात आले. पाच हजार व्हिजिबिलीटी असताना विमान का उतरवण्यात आले.
- शांभवी पाठक ओ शट शट असे का म्हणतात. त्या आधीच संभाषण का आले नाही. केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल ईटीसीएचे ट्रान्सस्क्रिप्ट यांच्या वेळेत फरक कसा.
- नरेश अरोराच्या कंपनीच्या कामावर अजित पवार नाखुश होते.
- व्हीएसआर संदबंधात प्रश्न, हेवी बेस्ट मेंटेनन्स कुठे केला जातो.
कुणाला मारायचे असेल तर आधी चालकाला मारा
रोहित पवार यांनी या वेळी ‘‘राईज अॅण्ड किल फर्स्ट’’ या पुस्तकातील एक संदर्भ सांगितला. एखाद्या व्यक्तीला मारायचे असेल तर त्या व्यक्तीच्या चालकाला मारले तर विषयच संपला असे त्यात म्हटले होते. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी तीन नावे घेत शंका उपस्थित केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हीएसआर विमान कंपनी, अॅरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका आहे. या सर्व चर्चेत अॅरो नावाच्या कंपनीने व्हीएसआरचे विमान हायर केले होते. सरकारी जीआरनुसार घेतले होते. पवार नावाचा माणूस अॅरोचा हँडलर आहे. त्याने व्हिजिबिलीटी क्लिअर असल्याचे म्हटले आहे. ही कंपनी बऱ्याच राज्यांत काम करत आहे. या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध आहे, असे रोहित पवार म्हणाले.
विमान कंपनीचे ‘27’ शेअर होल्डर्स
ज्या व्हीएसआर कंपनीचे हे विमान होते, त्या कंपनीच्या मालकी हक्काबाबतही त्यांनी गौप्यस्पह्ट केला. कागदावर 3 शेअर होल्डर्स दिसत असले तरी प्रत्यक्षात 27 शेअर होल्डर्स आहेत आणि वेळ आल्यास ही नावे उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
विमान अपघाताची परदेशी संस्थांकडून चौकशी करा
सीआयडीकडे चौकशी कुणी सोपवली, सीआयडीला विमानतळावर जाण्याची परवानगी तरी आहे का, असा सवाल करताना रोहित पवार यांनी, अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी त्रयस्थ अशा परदेशी कंपनीकडून करण्यात यावी, असे रोहित पवार म्हणाले. लंडनमधील विमान अपघात चौकशी शाखा (एएआयबी), फ्रान्समधील ब्युरो ऑफ इन्क्वायरी एन्ड एनालिसीस फॉर सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी (बीईए) किंवा अमेरिकेतील एनटीएसबी या संस्थांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
विदर्भातील नेत्यामुळे दादांना कारऐवजी विमानाने जावे लागले
दादा बारामतीसाठी कारने निघणार होते. त्यांचा ताफाही तयार होता. पण एक नेता दादांना भेटायला येणार होता त्याला पोहोचायला उशीर झाला. पूर्व विदर्भातील एका नेत्याला फाईल क्लिअर करायची होती. त्यामुळे दादा थांबले होते. ती फाईल मंत्रालयात असल्याने ट्रफिकमुळे फाईल पोहोचायला उशीर झाला. त्यातही वेळ गेला. त्यामुळे दादा गाडीने जाऊ शकले नाहीत आणि त्यांनी 7.13 वाजता विमान बुक केले. तो उशीर जाणीवपूर्वक केला गेला का? असाही सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. पूर्व विदर्भातील हा नेता प्रफुल्ल पटेल हे असावेत, अशी चर्चा आहे.
1 दादा ज्या विमानातून जाणार होते त्या विमानाचा पायलट आणि को-पायलट असे दोघेही ऐन वेळी का बदलण्यात आले?
2 विमान खाली येताना एका बाजूला कलले होते, त्यामागे कारण काय?
मेपॅनिकल फेल्युअर होते का?
3 शांभवी पाठक ‘ओ शट शट’ असे का म्हणतात? त्या आधीचं संभाषण का आले नाही? केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल ईटीसीएचे ट्रान्सस्क्रिप्ट यांच्या वेळेत फरक कसा?
4 सुमीत कपूर या पायलटवर दारू प्यायल्यामुळे तीन वर्षे बंदी आणली होती. मग अशा पायलटला व्हीआयपी लोकांच्या विमानाचा पायलट का बनवलं?
5 व्हीएसआर कंपनीच्या विमानांना युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण हिंदुस्थानात अजूनही ती का वापरली जातात?
6 विमान कोसळतेय हे दिसूनही शेवटच्या काही मिनिटांत मुख्य पायलट सुमित एक शब्दही बोलले नाहीत, याचा अर्थ काय?
7 कधीही काही होऊ शकते याच्या भीतीमुळे दादा प्लॅस्टिक बाटलीऐवजी काचेची बाटली वापरत होते. हा धोका कसा असल्याचे सांगताना त्यांनी
प्लॅस्टिकच्या बाटलीत सिरिंज टोचून दाखवली.
8 विमानाचा रूटिन मेंटेनन्स झालं नव्हतं का? ते कुणी केलं होतं? विमानाचा हँगर सीसीटीव्ही कुठे आहे? पायलट वेळेत आले असताना उड्डाण उशिरा का करण्यात आले?
दोन दिवस आधी विमान सुरतला जाऊन आले
लेअरजेट (बंबार्डिअर) हे 51,000 फुटांपर्यंत उडू शकणारे अतिवेगवान विमान आहे. अशा विमानाचे उड्डाणापूर्वी रीतसर इन्स्पेक्शन झाले होते का? जर झाले असेल, तर ते करणार्या कर्मचार्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. अपघाताच्या दोन दिवस आधी हे विमान ‘मुंबई-सुरत-मुंबई’ असे फिरून आले होते, असेही त्यांनी सांगितले.




























































