… तर निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये, रोहित पवार यांची टीका

बिहारच्या मतदार यादीतील ज्या लोकांना निवडणूक आयोगाने मृत घोषित केले अशा काही व्यक्तींची लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज भेट घेतली. राहुल गांधी यांनी या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअऱ केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. तसेच या सर्व प्रकारासाठी निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये? असा सवाल त्यांनी केला आहे.

”Horrible…! हिंदुस्थान हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश असून या लोकशाहीत प्रौढ नागरिकाचा मताधिकार हा सर्वांत अमूल्य अधिकार आहे, पण अशा पद्धतीने जीवंत मतदारांना मृत दाखवलं जात असेल तर निवडणूक आयोगावर देशद्रोह, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, जन्म मृत्यू नोंदणी कायदा, लोकप्रतिनिधी कायदा अशा वेगवेगळ्या कायद्याखाली गुन्हा का दाखल करू नये? असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.