निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले, रोहीत पवार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर व निवडणूक चिन्हावर अजित पवार गटाने देखील दावा केला आहे. याचा वाद सध्या निवडणूक आयोगात आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे.

”शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यामुळे पक्षाचे नाव चिन्ह हे कायदेशीररित्या त्यांच्याकडेच राहिल असं आम्हाला वाटतं मात्र निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील बाहुलं आहे, त्यामुळे ते आमच्या बाजुने निर्णय देतील का? याबद्दल थोडी शंकाच आहे’ असे रोहीत पवार म्हणाले. ”निवडणूक आयोग आमच्या विरोधात निर्णय देण्याची शक्यता आहे. मात्र भविष्यात जर हा वाद न्यायालयात पोहोचला तर तिथे ही लढाई आम्ही नक्कीच जिंकू”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्यासह 40 बंडखोर आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करून केली आहे.