रोहीतने शेअर केला झोपेत बडबडणाऱ्या धवनाचा व्हिडीओ

563

हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज रोहीत शर्मा याने सोशल मीडियावर शिखर धवनचा विमानातील एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात शिखर झोपेत चक्क बडबडत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ बघून रोहीत आणि शिखरच्या चाहत्यांच्या हसून हसून पोटात दुखू लागलंय.

या व्हिडीओच्या खाली रोहीतने एक मजेशीर कॅप्शनही दिली आहे. त्यात तो माझ्याशी बोलत नाहीयेत. तसेच एखाद्या काल्पनिक मित्राबरोबर बोलण्याचं त्यांचं वयही नाहीये. मग इतका वेडेपणा का करताय जाट शिखर धवन असं रोहीतनं यात म्हटलं आहे.

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धवन याने मी शायरीची प्रॅक्टीस करत होतो आणि याने त्याचा व्हिडीओ काढला. खूप मनापासून मी शायरी आठवत होतो. जर तेवढ्याच मनाने मी अभ्यासही करायला हवा होता. अशी प्रतिक्रिया धवन याने दिली आहे. दोन मित्रांच्या या मजा मस्तीच्या व्हिडिओने त्यांच्या चाहत्यांचा मात्र विरंगुळा झाला आहे. अनेकांनी त्यांची ही मैत्री अशीच राहो अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या