
टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने कसोटीमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. तब्बल 10 महिन्यानंतर पांढऱ्या कपड्यामध्ये मैदानात उतरलेल्या रोहितने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीला खेळताना शतकी खेळी केली. रोहितने 154 चेंडूमध्ये शतक झळकावले. कसोटीमधील हे त्याचे चौथे शतक आहे.
एक दिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या रोहितला कसोटीमध्ये सलामीला खेळण्याची संधी मिळाली. मयांक अग्रवालसोबत त्याने डावाची सुरुवात केली. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या रोहितने केशव महाराज याच्या गोलंदाजीवर षटकार खेचत आज आपण ‘लंबी रेस का घोडा’ होणार असल्याचे दाखवून दिले. रोहितने एकेरी-दुहेरीसह चौकार आणि षटकारांसह आपला डाव पुढे नेला. लंचपर्यंत हिंदुस्थानच्या बिनबाद 91 धावा झाल्या होत्या.
@ImRo45 #INDvSA pic.twitter.com/BsqCeWdTQm
— BCCI (@BCCI) October 2, 2019
यानंतर 35 व्या षटकामध्ये टीम इंडियाचे शतक फळकावर लागले. दरम्यान रोहित आणि मयांकने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर रोहितने आणखी आक्रमक होत शतकाला गवसणी घातली. रोहितच्या शतकानंतर फिरकीपटू हरभजन सिंह याने ट्वीट करून त्याचे कौतुक केले.
Wah @ImRo45 Brilliant 100.. dress blue ho ya white koi fark nahi padta.. Rohit HiT hai bhai @BCCI @StarSportsIndia #INDvSA
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 2, 2019
खराब लाईटमुळे खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाच्या 59.1 षटकात बिनबाद 202 धावा झाल्या होत्या. रोहित 12 चौकार आणि 5 षटकारांसह 115, तर मयांक 11 चौकार आणि 2 षटकारांसह 11 धावांवर खेळत होता.
ICYMI
The HITMAN is back with a bang
Rohit Sharma gets his first Test ton as an opener! pic.twitter.com/DsLfnGCzca
— ICC (@ICC) October 2, 2019






















































