रोहितने केली विराट, गंभीरशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडत आपण याही प्रकारात चांगली कामगिरी करू शकतो हे दाखवून देणार्‍या रोहित शर्माने आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. याचसह क्रिकेटच्या कसोटी, वन डे व ट्वेण्टी-20 या तिन्ही प्रकारांत अव्वल दहामध्ये एण्ट्री मारणारा हिंदुस्थानचा तो तिसराच क्रिकेटपटू ठरलाय. याआधी विराट कोहली व गौतम गंभीर यांना ही करामत करता आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टीवन स्मिथने कसोटी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर असून हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहली दुसर्‍या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसर्‍या तसेच चेतेश्वर पुजारा चौथ्या स्थानावर विराजमान आहे. गेल्या दोन मालिकांमध्ये टीम इंडियासाठी मोलाची कामगिरी बजावणारा मराठमोळा अजिंक्य रहाणे याने पाचव्या स्थानावर मुसंडी मारली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या