…पण रोहित शर्माला नकोय विश्रांती; वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची इच्छा

2137

बांगलादेशाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेनंतर टीम इंडियामायदेशात एकदिवसीय व टी-20 मालिकेत वेस्ट इंडीजशी भिडणार आहे. यासाठी गुरुवारी हिंदुस्थानी संघाची निवड होणार आहे. संघनिवड समिती हिटमॅनरोहित शर्माला विश्रांती देण्याचा विचार करत आहे, मात्र रोहित विश्रांती घेण्याच्या मूडमध्ये नसून तो विंडीजविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहे.

टीम इंडियाला विंडीजशी खेळल्यानंतर न्यूझीलंडच्या मोठय़ा दौऱयावर जायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रमुख खेळाडू असलेल्या रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निवड समितीचा मानस आहे, मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रोहितला विश्रांती नकोय. ‘टीम इंडियाचा हा सलामीवीर या वर्षीच्या सुरुवातीपासून सातत्याने क्रिकेट खेळतोय. वर्ल्ड कपनंतर त्याने विश्रांती घेतलेली नाही. कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांडय़ासह काही खेळाडूंना वर्ल्ड कपनंतर विश्रांती देण्यात आली आहे. आता रोहितलाही वन डे क्रिकेटमधून विश्रांती देण्याचा निवड समितीचा विचार आहे

मयांकला संधी

संघ निवड समितीने विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या जागेवर मयांक अग्रवालला संधी मिळू शकते. मयांकने कसोटी फॉरमॅटमध्ये स्वतःला सिद्ध करताना आठ सामन्यांत 71.5 च्या सरासरीने 858 धावा फटकावल्या आहेत. यात त्याने दोन दुहेरी शतके, एक शतक, तर तीन अर्धशतके ठोकली आहेत. मयांक हा आक्रमक फलंदाज असल्याने निवड समिती त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे गुरुवार, 21 नोव्हेंबरला होणाऱया टीम इंडियाच्या निवडीवर क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.

आपली प्रतिक्रिया द्या