‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी

201

सामना ऑनलाईन । लंडन

टीम इंडियाचे यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत संपुष्टात आले. पण हिंदुस्थानचा उपकर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्माने 9 लढतींत 648 धावा फटकावत सर्वाधिक धावांसह आयसीसीच्या ‘गोल्डन बॅट’वर आपले नाव दिमाखात कोरले. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 10 लढतींत सर्वाधिक 27 विकेट मिळवत ‘गोल्डन बॉल’ पटकावला.

रोहित शर्मासोबत गोल्डन बॅटच्या शर्यतीत असलेले ‘कांगारूं’चा डेव्हीड वॉर्नर (647) दुसऱया स्थानावर तर बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसन (606 धावा) तिसऱया स्थानी राहिला. त्यानंतर केन विलियम्सन (न्यूझीलंड), जो रूट (इंग्लंड), जॉनी बेयरस्टॉ (इंग्लंड) आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार एरॉन फिंच (507 धावा) यांचा क्रमांक लागला. गोलंदाजांत अपेक्षेनुसार ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 27 विकेट मिळवत टॉपच्या स्थानासह ‘गोल्डन बॉल’ पटकावला.

आपली प्रतिक्रिया द्या