ट्रेंड – बायकोसाठी आणतो प्रत्येक देशातील फुले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर पायलटचा एक रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इंडिगोच्या माजी फ्लाइट अटेंडंट मेघा झा यांनी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा पती पायलटच्या ड्रेसमध्ये एका हातात केबिन सुटकेस तर दुसऱ्या हातात जांभळ्या फुलांचा गुच्छ घरात घेऊन येताना दिसतो आहे. ‘मी अशा व्यक्तीशी लग्न केलं आहे जो वेगवेगळ्या देशांतून माझ्यासाठी फुले आणतो’ असे मेघा झा यांनी व्हिडीओला कॅप्शन देताना लिहिले आहे. मेघाच्या माहितीनुसार, तिचा पायलट पती वेगवेगळ्या देशांतून प्रवास करतो आणि या प्रवासादरम्यान परत येताना त्याच्या बायकोसाठी त्या देशातील काही खास फुले घेऊन येतो आणि बायकोला घरी येताच देतो?