चालत्या ट्रेनमधून पडला खाली, आरपीएफ जवानाने वाचवले प्राण; पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बल्लारशाह रेल्वे स्थानकात आरपीएफ जवनाच्या तत्परतेने एका युवकांचे प्राण वाचले, बोगीमध्ये सामान चढवून चालू गाडीतून उतरतना एक युवक पाय घसरून पडला. रुळाखाली जात असताना तेथे उपस्थित आरपीएफ च्या जवनाने त्याला खेचून त्याचा जिव वाचविला. ही घटना मंगळवारी रात्री 12 वजन 10 मिनिटाने घडली आहे. सुरेश कुकरेजा सदर युवकांचे नाव आहे. तर त्याला वाचवणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जावांचे नाव सुनील पासवान असे आहे.

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 5 वर मंगळवारी रात्री अहमदाबाद कडे जाणारी नवजीवन एक्सप्रेस या गाडीने आपल्या कुटुंबास सोडण्यासाठी सुरेश कुकरेजा आले व सामान बोगीमध्ये चढवू लागले एवढ्यात गाडी सुरु झाली व उतरतना ते घसरून पडले. रुळाखाली जाणार तेवढ्यात तिथे उभे असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सुनील पासवान यांनी त्याला ओढून चालत्या ट्रेन पासून दूर करत त्यांचे प्राण वाचवले. या घटनेत सदर युवकास डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. आरपीएफचे जवान सुनील यांनी केलेल्या कामगिरी व तत्परतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.