ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेली हिंसा दुर्भाग्यपूर्ण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घटनेचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suresh-bhaiyyaji-joshi

दिल्लीत मंगळवारी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. ही घटना दुर्भाग्यपूर्ण असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी आपले बलिदान दिले त्यांचा हा अपमान असल्याचेही संघाने म्हटले आहे.

रा.स्व. संघाचे महासचिव भैय्याजी जोशी म्हणाले की, “प्रजासत्ताक सारख्या पावन दिवशी हिंसा होणे ही एक निंदनीय घटना आहे. लाल किल्ल्यावर दुसराच झेंडा फडकावला गेला ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. तसेच ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले त्यांचा हा अपमान असल्याचेही जोशी यांनी सांगितले. देशवासियांनी आपले राजकीय आणि वैचारिक मदभेद बाजूला सारुन शांती प्रस्थापित करावी असे आवाहन जोशी यांनी केले आहे.