इम्रानसाब, आमचा प्रचार केल्याबद्दल धन्यवाद! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया

785

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दहशतवादाच्या विरोधात असल्यानेच संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संघाला लक्ष्य केले आणि असे करून त्यांनी एकप्रकारे संघाचा प्रचारच केला आहे अशी प्रतिक्रिया संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी कृष्ण गोपाल यांनी आज दिली. संघाला प्रसिद्धी दिल्याबद्दल आम्ही इम्रान खान यांचे आभारी आहोत अशी उपहासात्मक टिप्पणीही त्यांनी केली.

कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यास संघ जबाबदार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे कार्यकर्ते आहेत असे वक्तव्य इम्रान यांनी संयुक्त राष्ट्र संघात केले होते. संघ हा फक्त हिंदुस्थानात आहे, जगात कुठेही संघाची शाखा नाही, मग पाकिस्तानचा आमच्यावर राग का, असा प्रतिसवाल गोपाल यांनी केला. ‘पाकिस्तानचा संघावर राग आहे म्हणजेच त्यांचा हिंदुस्थानवर राग आहे. संघ आणि हिंदुस्थान हे वेगळे नसून समानच आहेत हे जगाला कळलेच पाहिजे आणि ते काम इम्रानसाहेबांनी चोखपणे बजावल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो’ असे गोपाल म्हणाले. दहशतवादाचे चटके ज्यांनी सोसले आणि जे दहशतवादाला विरोध करतात त्यांना आता कळले असेल की संघही दहशतवादविरोधी आहे असे ते पुढे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या