दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आरएसएस, गुप्तचर यंत्रणेने दिला इशारा

249

येत्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते, आणि त्यांची कार्यालये दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशा हल्ल्यांचा धोका जास्त आहे. गुप्तचर यंत्रणा आयबीने यासंदर्भात सूचना दिली आहे.

आयबीच्या माहितीनुसार, जागतिक दहशतवादी गटांशी जोडलेली माणसे आरएसएसची कार्यालये आणि पोलीस स्टेशनवर हल्ल्याची योजना आखू शकतात. दहशतवादी स्फोटकांनी भरलेली गाडी हल्ल्यांसाठी वापरू शकतात. हा धोका लक्षात घेता आयबीने संबंधित राज्यांना सुरक्षाव्यवस्था वाढवण्यास सांगितले आहे.

गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱयानंतर महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि आसाम येथील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. आरएसएस पदाधिकाऱयांच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या