
सामना ऑनलाईन । सांगली
कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये पुराने थैमान घातलेले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्र पूरग्रस्तांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला आहे. ठिकठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू आहे. सरकारी मदतीसह स्वसंसेवी संस्थाही मदतीसाठी मैदानात उतरल्या आहेत. आपत्तीच्या क्षणी नेहमीच मदतीसाठी अग्रेसर असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थाही यात मागे नाही. पूरग्रस्त भागामध्ये आरएसएसचे स्वयंसेवक थेट पाण्यात उतरून मदत करताना दिसत आहेत. तसेच सांगलीमध्ये आरएसएसने मदत शिबिराची स्थापन केली असून पूरग्रस्त लोकांना जेवणाचे वाटप सुरू आहे. शिबिरामध्ये शेकडो लोकांचे जेवण बनवण्याचे, व्यवस्थित पॅकिंग करण्याचे काम सुरू आहे. हे खाद्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याचे फोटो ट्वीट केले आहेत.



























































