आरएसएसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पूर्व प्रांत सहसंघचालक श्रीराम जोशी यांचे निधन

466

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पूर्व प्रांत सहसंघचालक श्रीराम शंकर जोशी यांचे बुधवारी दुपारी 4.15 वा त्यांचे राहते घरी धरमपेठ येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.

स्थानिक विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयामधून ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळून संबंध होता. त्यांचे मागे यांचे भाऊ लक्ष्मण, वहिनी, तीन मुले, सून व नातवंडे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या