
आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव असलेल्या खासगी शाळांतील जागांवर प्रवेशासाठी निवासी पुराव्यातील गॅसबुक हे रद्द केले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी करत आवश्यक कागदपत्रांची सुधारित यादी जाहीर केली आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून राष्ट्रीयीकृत बँक वगळता अन्य बँकांचे खातेपुस्तक (पासबुक) ग्राह्य धरले जाणार नाही. येत्या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पालकांना 1 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज, टेलिफोन बिल देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. ही कागदपत्रे अपूर्ण असतील तर भाडेकरार ग्राह्य धरण्यात येईल.

























































