
दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, आयर्लंड, फ्रान्स, वेल्स, ऑस्ट्रेलिया, स्काॅटलंड, जपान, अर्जेंटिना हे देश रग्बी या खेळातील अव्वल दहा देश. हा खेळ ऑलिम्पिक स्पोर्ट म्हणून ओळखला जातो. पण हिंदुस्थानला अद्याप या खेळातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवता आलेला नाही. अर्थात या खेळाला आपल्या देशात उशिरा मान्यता मिळाली. अन्यथा याआधी क्लब स्तरावर हा खेळ खेळला जात होता. गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रासह हिंदुस्थान या खेळामध्ये प्रगती करताना दिसत आहे. मात्र आगामी वर्षांमध्ये आशियाई स्तरावर अव्वल पाच संघांमध्ये येण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे, असे स्पष्ट मत रग्बी इंडियाचे नॅशनल डेव्हलपमेंट व्यवस्थापक संदीप मोसमकर यांनी व्यक्त केले. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितले की, रग्बी या खेळात आशियाई स्तरावर चमकल्यास पेंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून सर्व प्रकारच्या सुविधा या खेळासह यामधील खेळाडूंना उपलब्ध होतील. त्यामुळे आगामी काळ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
कोच व रेफ्रींसाठी कोर्स
रग्बी इंडिया व रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून रेफ्री व कोचेससाठी कोर्सेसचे आयोजन केले जाते. जागतिक रग्बी संघटनेच्या नियमांसह ही परीक्षा पार पडते. प्रॅक्टिकल व ऑनलाईन पद्धतीने इच्छुकांना परीक्षा द्यावी लागते. यानंतर यामध्ये उत्तीर्ण होणाऱयांना पुढील दोन वर्षांसाठी या कोर्सशी निगडित काम करावे लागते. कोचेसना सेमीनार किंवा वर्पशॉपमध्ये काम करावे लागते. रेफ्रींना लढतींमध्ये आपली उपस्थिती दाखवावी लागते. कोर्सेसची लेव्हल वाढवत गेल्यास आशियाई व जागतिक स्तरापर्यंतही पोहचता येते. पण जागतिक स्तरापर्यंत पोहचणे अवघड असते, असे संदीप मोसमकर पुढे सांगतात.
30 जिह्यांमध्ये खेळला जातोय
रग्बी हा खेळ महाराष्ट्रातील 30 जिह्यांमध्ये खेळला जातोय. यामधील 28 जिल्हे पूर्णतः सक्रिय आहेत. शिवाय हिंदुस्थानात 27 राज्ये व एक सर्व्हिसेस असे मिळून 28 संघ हा खेळ खेळतात. जागतिक स्तरावर (रग्बी फिफटीन्स) खेळताना एका संघात मैदानामध्ये 15 खेळाडू अनिवार्य असतात. तसेच आठ खेळाडू बेंचवर बसलेले असतात. ऑलिम्पिकमध्ये (रग्बी सेव्हन्स) सात खेळाडू मैदानात खेळतात आणि पाच खेळाडू बेंचवर बसलेले असतात. तसेच जागतिक स्तरावर रग्बीचा सामना दोन 40 मिनिटांच्या सत्रात रंगतो. दोन सत्रांमध्ये सात ते दहा मिनिटांचा ब्रेक असतो. ऑलिम्पिक स्तरावर सात मिनिटांची दोन सत्रे असतात. तसेच दोन सत्रांमध्ये दोन मिनिटांचा ब्रेक असतो, असे संदीप मोसमकर पुढे नमूद करतात.
अल्पावधीत प्रगती
रग्बी या खेळाने अल्पावधीत महाराष्ट्रासह हिंदुस्थानात प्रगती केलीय. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, युथ गेम्स, आशियाई युथ गेम्स, वर्ल्ड पोलीस व फायर गेम्स, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स, आशियाई स्पूल गेम्स या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱया खेळाडूंना महाराष्ट्र सरकारकडून नोकरी देण्यात येते. तसेच 17 व 19 वर्षांखालील वयोगटात क्रीडागुणांची सवलतही देण्यात येते. महाराष्ट्रातील मानाच्या समजल्या जाणाऱया शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठीच्या यादीत या वर्षापासून रग्बी खेळणाऱया खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून क श्रेणीतील नोकरीसाठीही रग्बीपटूंना विचार करण्यात आला आहे, असे संदीप मोसमकर सांगतात.
परिस्थिती सुधारल्यास हिंदुस्थानात स्पर्धा होतील
कोरोनामुळे रग्बीच्या स्पर्धा या वर्षी आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या नाहीत. पण कोरोनावर नियंत्रण मिळवल्यास व सरकारकडून परवानगी मिळाल्यास जानेवारी ते मार्च या कालावधीत स्पर्धा खेळवण्यात येऊ शकतात. सब ज्युनियर, ज्युनियर व सीनियर या राष्ट्रीय स्पर्धा खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आशियातील स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये सुपर रग्बी स्पर्धा सुरू झालीय, अशी माहिती संदीप मोसमकर यांनी यावेळी दिली.
श्रीलंकेत खेळ बघण्यासाठी क्रीडाप्रेमींच्या उडय़ा
आशिया खंडात या खेळामध्ये जपानचा संघ अव्वल स्थानावर आहे. रग्बीच्या वर्ल्ड कपमध्ये या खंडामधून एकच संघ पात्र ठरतो. त्यामुळे जपान वर्ल्ड कपमध्ये आशिया खंडाचे प्रतिनिधित्व करतो. आशिया खंडातील रग्बीतील सर्वोत्तम संघांमध्ये हाँगकाँग दुसऱया आणि श्रीलंका तिसऱया स्थानावर आहे. श्रीलंकेत रग्बी या खेळाला तुफान प्रतिसाद लाभतो. शालेय स्तरावरही तिकीट काढून लढत बघितली जाते, असे संदीप मोसमकर आवर्जून सांगतात.
राष्ट्रीय स्पर्धांमधील महाराष्ट्राची कामगिरी
2007, गुवाहाटी – पुरुषांच्या संघाला सुवर्ण मेडल
2011, रांची – पुरुषांच्या संघाला सुवर्ण मेडल
2015, केरळ – पुरुषांच्या संघाला कास्य पदक
2015, केरळ – महिलांच्या संघाला रौप्य पदक




























































