‘जेईई मेन’ परीक्षेसाठी कोरोना प्रतिबंधक सुरक्षा, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

597

दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेली ‘जेईई मेन 2020’ ही परीक्षा येत्या 1 ते 6 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून त्या परीक्षेसाठी कडक कोरोना प्रतिबंधक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. परीक्षेसाठीच्या मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत.

अशा आहेत सूचना…
– परीक्षेवेळी सॅनिटायझेशनची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान तासभर आधी पोहोचावे लागेल.
– विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यासाठी ठराविक वेळा देण्यात आल्या आहेत. जेणेकरून एकाच वेळी गर्दी होणार नाही.
– परीक्षेचे प्रवेशपत्र आणि ओळखपत्र दाखवल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
– इतर कोणत्याही वस्तू किंवा बॅगा आणण्यास मनाई आहे.
– सोशल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक. विद्यार्थ्यांनी आपल्या क्रमांकाच्या आसनावरच बसावे.
– परीक्षेदरम्यान रफ कामासाठी प्रत्येकाला एक कोरा कागद, पेन, पेन्सिल दिली जाईल. त्यावर विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव लिहावे आणि परीक्षा झाल्यानंतर तो पेपर शिक्षकांना परत करावा.
– पेपर-2 साठी कंपास बॉक्स, कलर पेन्सिल आणि रंग घेता येतील पण वॉटर कलरला मनाई आहे.
– हजेरीसोबत आपला फोटो, स्वाक्षरी आणि अंगठय़ाचा ठसा योग्य असल्याची खात्री विद्यार्थ्यांनी करावी.

आपली प्रतिक्रिया द्या