
इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधनटंचाईचा धसका घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल डिझेल कमी वापरण्यास सांगितले आहे. एकीकडे देशावर इंधन टंचाईचे संकट असताना दुसरीकडे हिंदुस्थानच्या रुपयाची घसरण थांबण्याचे नाव घेत नाहीये. मंगळवारी पुन्हा एकदा रुपयाने विक्रमी निचांकी गाठली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया हा 95.63 या स्तरावर पोहोचला आहे. अमेरिका व इराणमधील वाढत्या तणावाचा फटका कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला असून त्याचा थेट फटका हिंदुस्थानच्या चलनाला बसला आहे.
मंगळवारी सकाळी बाजाराला सुरुवात झाली तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 95.57 होती. त्यानंतर काही वेळातच रुपयाची घसरण सुरू झाली व रुपया 95.63 वर पोहोचला. सोमवारी देखील रुपया हा 79 पैशांनी घसरून 95.28 वर बंद झाला होता.


























































