मोटारसायकलच्या डिक्कीतील ७८ हजार रुपये पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले ७८ हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना शहरात घडली.

सुमित सुदाम फरतडे रा. मदने नगर लातूर यांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादी हा त्याची मोटारसायकल क्र. एमएच २४ बीसी ०२२७ ही त्याचे मित्र उमेश साठे यांच्या मेडिकल दुकानासमोर उभी करून समोरील दुकानात गेले. तेथून परत येऊन डिक्कीमधील काही पैसे मित्रास देण्यासाठी डिक्की उघडली असता डिक्कीमध्ये ठेवलेले कापडाच्या पिशवीतील रोख ७८ हजार रुपये गायब झालेले दिसले. अज्ञात चोरट्याविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.