
रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाशी चर्चेची तयारी दाखवली असली तरी रशियाकडून मात्र युक्रेनच्या शहरांवर हल्ले सुरूच आहेत. विशेष म्हणजे रशियाने आपला मोर्चा आता सोशल मीडियाकडे वळवला असून फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दहशतवादी असल्याचे सांगत या दोन्ही प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. रशियन न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातल्यानंतर रशियातील सर्वात मोठी डेअर प्रॉडक्ट डॅनॉन, कोका कोला या कंपन्यांनी गाशा गुंडाळण्याची घोषणा केलीय. शूज कंपनी नाईके आणि स्विडीश कंपनी आयकिया यांनी आपापले स्टाअर्स तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

























































