रशियाचा ‘वाडा’चिरेबंदी कोसळला, चार वर्षे सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतून बाहेर

582

आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामधील सुपर पॉवर असलेल्या रशियाला सोमवारी दणका बसला. रशियाकडून खेळाडूंच्या डोपिंगबाबत चुकीची माहिती देण्यात आल्यामुळे जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेकडून (वाडा) त्यांच्यावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रशियाचा खेळ पुढील चार वर्षे सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून खल्लास झाला आहे. रशियन क्रीडापटूंना आता 2020 मधील टोकियो ऑलिम्पिक व 2022 मधील फुटबॉल वर्ल्ड कपला मुकावे लागणार आहे. यामुळे रशियाचा ध्वज, राष्ट्रगीत व संघाचे नाव कुठल्याही स्पर्धेत पाहायला मिळणार नाही.

याबाबत माहिती देताना ‘वाडा’ने सांगितले की, रशियाने डोंपिंग टेस्टसाठी आपल्या खेळाडूंचे चुकीचे नमुने पाठवल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. स्वित्झर्लंडमध्ये ‘वाडा’च्या 12 सदस्यीय समितीच्या बैठकीत रशियावर बंदी घालण्याच्या निर्णयावर एकमत झाले. रशियाच्या उत्तेजक विरोधी संस्थेचे प्रमुख युरी गानस यांनी रशियावर चार वर्षांची बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.

n वाडाने घेतलेल्या निर्णयास रशियाला पुढील 21 दिवसांच्या आत आव्हान देता येणार आहे. रशियाने या निर्णयास आव्हान दिल्यास या प्रकरणावर स्वित्झर्लंडमधील क्रीडाविषयक आंतरराष्ट्रीय लवादापुढे सुनावणी होईल.

n वाडाकडून देण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देऊच शकलो नसतो. यामध्ये विजय मिळवणे कठीणच होते. या निर्णयाचा मोठा फटका खेळाडूंना बसला आहे. ही शोकांतिकाच ठरलीय, असे निराश उद्गार रशियाच्या उत्तेजकविरोधी संस्थेचे प्रमुख युरी गानस यांनी यावेळी काढले.

आपली प्रतिक्रिया द्या