
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवल्याचा प्रचार मोदी सरकार व त्यांच्या पाठीराख्यांकडून सुरू असला तरी वास्तव वेगळेच आहे. एका मागोमाग एक देश पाकिस्तानशी आर्थिक सहकार्य करार करत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, अमेरिका व तुर्कीनंतर आता रशियाने देखील पाकिस्तानशी महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारानुसार, रशिया कराचीमध्ये एक अत्याधुनिक पोलाद प्रकल्प उभारणार आहे. या करारामुळे पाकिस्तानच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून रोजगारही वाढणार आहे. यातून अर्थव्यवस्थेला अब्जावधी रुपयांचा लाभ होणार आहे.