रशिया-युक्रेन युद्ध – रशियाकडून ‘मोस्कवा’ चा बदला; नेप्च्यून क्षेपणास्त्र बनवणारे संयंत्र नष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. महिन्याभरानंतरही हा संघर्ष थांबत नाही. युक्रेनही आता आक्रमक झाले असून त्यांनी रशियाचे लडाऊ जहाज ‘मोस्कवा’ उद्ध्वस्त केले. युक्रेनच्या या कारवाईमुळे रशिया संतापला असून रशियाने याचा बदला घेतला आहे.

युक्रेनने ‘मोस्कवा’ उद्ध्वस्त केल्याचा रशियाने बदला घेतला आहे. रशियाने याचा बदला घेण्यासाठी कीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. युक्रेनने रशियाचे ‘मोस्कवा’ उद्ध्वस्त केल्यानंतर युद्धाला वेगळेच वळण लागले आहे. रशियाने प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली आहे. रशियाच्या सैन्याने कीवमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ले करत नेप्च्यून क्षेपणास्त्र बनवणारे संयंत्र उद्ध्वस्त केले आहे. या घटनांमुळे दोन्ही देशातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.