
युक्रेनविरुद्धचे युद्ध थांबवण्यासाठी जगभरातून दबाव येत असतानाही माघार न घेणाऱया रशियाने आज आणखी आक्रमक होण्याचे संकेत दिले. रशियाने अणुऊर्जेवर चालणाऱया नव्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली. ‘बुरेवेस्टनिक’ असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला अमर्याद असून आण्विक अस्त्रs वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. चाचणीदरम्यान बुरेवेस्टनिकने 14,000 किलोमीटरचे अंतर कापले आणि सुमारे 15 तास ते हवेत कार्यरत होते, अशी माहिती समोर आली आहे.
























































