अन्यायाविरुद्ध आवाज उठवत ऋतुजा बनली भारुडकार

महाराष्ट्रात आजही अनेक कुप्रथा आहेत, ज्या स्त्रियांवर अन्याय करतात. ज्यात अनेकाRच्या आयुष्याची, स्वप्नांची राखरांगोळी होते. या कुप्रथांविरुद्ध आवाज उठवणारे कथानक असलेला ‘सोंग्या’ हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. यात समाजातील अन्यायविरुद्ध ठामपणे उभ्या राहणाऱया एका जिद्दी तरुणीची भूमिका अभिनेत्री ऋतुजा बागवेने साकारली आहे. चित्रपटात भारुडाच्या माध्यमातून कुप्रथेविरुद्ध प्रभावी भाष्य करण्यात आले आहे. यासाठी ऋतुजाने भारूडकाराची वेशभूषा साकारत समर्पक संदेश दिला आहे.

‘येऊ दे जरा माणुसकीला जाग माणसा’ असे गीतकार गुरु ठाकूर यांचे मार्मिक शब्द संगीतकार विजय गवंडे यांनी संगीतबद्ध केले आहेत. चित्रपटात मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईपह्डे हे कलाकार दिसणार आहेत. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार ‘सोंग्या’ चित्रपटाचे निर्माते आहेत. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घुंगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. अनिष्ट रूढी परंपरांच्या जोखडात अडकलेल्या स्त्राr वेदनेचा परखडपणे वेध घेत समाजपरिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न ‘सोंग्या’चित्रपटाच्या माध्यमातून केला असल्याचे दिग्दर्शक मिलिंद इनामदार सांगतात