मरकझमध्ये सामील झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या मौलानाचा मृत्यू

2509

दिल्लीच्या तबलिगी जमात मरकजमध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका मौलानाही सामील झाले होते. त्यांना कोरोनाची लागण होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. त्यांचे नाव युसुफ टुटला असून त्यांचे वय 80 होते.

दिल्लीच्या तबलिगी जमात मरकजमध्ये मौलाना युसुफ टुटला दक्षिण आफ्रिकेतून आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते पुन्हा आफ्रिकेत आपल्या घरी गेले होते. घरी आल्यानंतर त्यांना ताप आला होता. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती सुधारत होती. परंतु सोमवारी त्यांची पुन्हा तब्येत बिघडली. हिंदुस्थान दौरा करू नये असा सल्ला त्यांना दिला होता परंतु त्यांनी ऐकले नाही.

मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह एका बॅगेत बंद करून दफन करण्यात आला. टूटला यांच्या कुटंबीयांना गेली 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या