‘साहो’ इतिहास रचणार, आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले 70 कोटी

40

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘बाहुबली -1’ आणि ‘बाहुबली -2’च्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेला अभिनेता प्रभास आगामी ‘साहो’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची हवा निर्माण झाली असून आतापर्यंत पोस्टर, टीझर आणि गाणे प्रदर्शित करण्यात आल्याने चाहत्यांनी उत्सुकता ताणली गेली आहे. यंदाच्या वर्षातील सर्वात जबरदस्त अॅक्शन चित्रपट असण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्मात्यांनी आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर तब्बल 70 कोटींचा खर्च केल्याची माहिती मिळत आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, साहोचे कॅमारामन मॅधी (Madhie) यांनी चित्रपटाच्या चित्रकरणाबाबत माहिती दिली. अबुधाबीमध्ये चित्रित करण्यात आलेल्या आठ मिनिटांच्या अॅक्शन सिक्वेन्सवर 70 कोटी रुपये खर्च झाले, असी माहिती त्यांनी दिली. हा चित्रपट आगामी काळात इतिहास रचणार असेही ते यावेळी म्हणाले. ‘साहो’ या चित्रपटातील अॅक्शन दृश्य केनी बेट्स याने दिग्दर्शित केले आहेत. चित्रपटातील हाणामारीचे 90 टक्के दृश्य खरे आहेत.

बिगबजेट ‘साहो’ चित्रपट सुजीतने दिग्दर्शित केला असून त्यात प्रभाससोबत नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, एव्हलिन शर्मा, मंदिरा बेदी असे तगडे कलाकार असणार आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2019 रोजी हिंदी, तमिळ आमि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

Hey darlings… Here comes the first song from our film, The Psycho Saiyaan.. Hope you all enjoy it.. ‬ (All Song Links in Stories) @shraddhakapoor @neilnitinmukesh @sujeethsign @tanishk_bagchi @dhvanibhanushali22 @sachettandonofficial @anirudhofficial #YazinNazir #BhushanKumar @uvcreationsofficial @tseries.official

A post shared by Prabhas (@actorprabhas) on

आपली प्रतिक्रिया द्या