‘सामना’चे पत्रकार शेख रहीम यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दैनिक ‘सामना’चे क्राईम रिपोर्टर शेख रहीम शेख पाशा (54) यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. जिन्सी भागातील गंजे शहिदा कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.

जिन्सी भागातील मदनी कॉलनी येथे राहणारे शेख रहीम हे गेल्या 30 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. दैनिक ‘सामना’मध्ये ते 2010पासून ‘क्राईम रिपोर्टर’ म्हणून कार्यरत होते. आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणांना वाचा फोडली.