
सामना ऑनलाईन। कोच्ची
केरळमधील शबरीमला येथील अयप्पा मंदिरात प्रवेश केल्यानंतर महिलांनी आता येथील अगस्तकुर्डम शिखरावर धडक मारली आहे. या शिखरावर अगस्ती ऋषींची समाधी असल्याने महिलांना यावर प्रवेशास मनाई आहे. मात्र केरळ उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी अगस्तकुर्डम शिखरावर महिलांना ट्रेकिंगसाठी परवानगी दिली होती. पण तरी एकाही महिलेने या शिखरावर जाण्याचे धाडस केले नव्हते. मात्र शबरीमला प्रवेशानंतर संरक्षण विभागाच्या प्रवक्त्या धान्या सनल या महिलेने शिखर सर करण्यास सुरुवात केली आहे.
आदिवासींच्या भावनांचा सन्मान करत असल्याने अगस्ती ऋषींच्या समाधी स्थळी नाही तर फक्त शिखरावर फिरायला जात असल्याचे धान्या यांनी सांगितले आहे. अगस्तकुर्डम शिखराची उंची 1868 मीटर असून हे शिखर चढण्यासाठी 4700 लोकांनी नाव नोंदले आहे. धान्या यांना संपूर्ण शिखर सर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. एक मार्च रोजी त्या शिखराच्या टोकावर पोहोचतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
#Kerala: Defense PRO Dhanya Sanal, first woman to trek to Agasthyarkudam peak, after 2018 Kerala High Court order that women cannot be excluded from trekking to the peak. Sanal says, “I’ll stick to take the pathway¬ go into prohibited areas&hurt the sentiments of the tribals.” pic.twitter.com/Kb4Vy4z3gr
— ANI (@ANI) January 14, 2019


























































