वैष्णोदेवी ट्रस्टला मिळाला नवा सीईओ

जम्मू कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या आदेशानुसार, प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सचिन कुमार वैश्य यांना श्री माता वैष्णोदेवी ट्रस्टचे सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कठुआचे उपायुक्त डॉ. राकेश मिन्हास यांची नियुक्ती जम्मूचे नवीन जिल्हा उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. प्रशासकीय स्तरावर करण्यात आलेल्या फेरबदलात 10 आयएएस आणि 4 जेकेएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.