सारा, अर्जूनसह सचिन तेंडूलकर मतदान करणार, मतदानाचेही केले आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मतदान हे लोकशाहीचे बक्षीस आहे, म्हणून आपण सर्वांनी मतदान केले पाहिजे असे आवाहन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने केले आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करून सचिनने हे आवाहन केले आहे.

सचिन म्हणतो, “आपण सगळ्यांची मतदान केले पाहिजे, २९ एप्रिलला फक्त मी आणि अंजली मतदान नाही करणार आहोत. तर यावेळी सारा आणि अर्जूनही मतदान करणार आहेत. तर मतदानासाठी बाहेर पडा असे आवाहनही सचिनने केले आहे.