
सामना ऑनलाईन । मुंबई
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान तब्बल अर्धा तास चर्चा झाली. मात्र या भेटीचे कारण गुलदस्त्यातच राहिले.
सचिन तेंडुलकरने सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शरद पवार यांची भेट घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना ऊत आला. मात्र ही भेट वैयक्तिक असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्ष सचिन तेंडुलकरनेही माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने नेमकी ही भेट कशासाठी होती हे मात्र कळू शकलेले नाही.



























































