मालवणात एसटीची सुरक्षितता मोहीम अभियान

422

प्रवासी हा एसटीचा आत्मा आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाला अधिकाधिक सेवा-सुविधा मिळायला पाहिजेत. प्रवाशांना एसटी प्रवासाकडे आकर्षित करताना त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालक-वाहकांनी कटिबद्ध राहायला पाहिजे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हाच खरा प्रवाशांचा सन्मान ठरेल, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप फार्णे यांनी केले.

मालवण एसटी आगार येथे 11 ते 25 जानेवारी या कालावधीत सुरक्षितता मोहीम अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मोहिमेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक फार्णे यांच्या हस्ते करण्यात आले. एसटी विभागाच्या विभागीय सांख्यिकी अधिकारी व मालवण आगार पालक अधिकारी श्रीमती नाडकर्णी, मालवण आगाराचे व्यवस्थापक नरेंद्र बोधे, पोलीस नाईक गुरुप्रसाद परब, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अरविंद कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या