जगातील पहिल्या ‘वृक्ष संमेलना’चे काऊंटडाऊन सुरू, बीडमध्ये पर्यावरणप्रेमींची उत्स्फुर्त दिंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुमार वृक्षतोड, भीषण दुष्काळ, पाण्याचे संकट यावर उपाय शोधण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी बीडमध्ये आज जगातील पहिले वृक्ष संमेलन मोठ्या थाटात होत आहे. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये हजारो पर्यावरणप्रेमींच्या उपस्थितीत पर्यावरण दिंडी निघाली. सिनेअभिनेता सयाजी शिंदेंसह असंख्य मान्यवर त्यामध्ये सहभागी झाले होते.

बीड येथे सह्याद्री देवराई प्रकल्पावर पहिल्या जागतिक वृक्ष संमेलनाची आज सुरूवात होत आहे. सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून वन विभागाच्या सहकार्यातून हे अनोखे वृक्ष संमेलन बीडमध्ये होत आहे. आज त्या अनुषंगाने वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. 13 आणि 14 पेâब्रुवारी रोजी बीड शहराजवळ असलेल्या पालवनच्या देवराई प्रकल्पावर पहिले वृक्ष संमेलन पार पडत आहे. त्यानिमित्ताने दोन दिवस अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

beed1

दोन दिवस चालणाऱ्या या वृक्ष संमेलनाच्या दिवशी मंगळवारी वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्ष संमेलनाच्या अध्यक्षपदी वडाचे झाड असणार आहे. वडाचे झाड रथामध्ये विराजमान असलेल्या या रथातून वृक्षाची मिरवणूक काढणयात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दिंडीला सुरूवात झाली. वृक्ष दिंडीचे सांगता सामाजिक न्याय भवन परिसरात करण्यात आली. आयोजित वृक्ष दिंडीमध्ये शेकडो मान्यवर, शालेय विद्यार्थी, पर्यावरण रक्षणाचा संदेश देत घोषणाबाजी करत होते.

काय आहे सह्याद्री देवराई?

sahyadri-devrai
सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनाची मोहिम राज्यभर हाती घेतली आहे. राज्यात 15 हून अधिक ठिकाणी देवराई प्रकल्प उभा करण्याचा त्यांचा संकल्प आहे. काही प्रकल्प सुरूपण झाले आहेत. बीडमध्ये देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून मोठी वृक्ष लागवड करण्यात आली. सह्याद्री देवराई प्रकल्पावर आज वृक्ष संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राज्यात पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी सयाजी शिंदे आणि त्यांच्यासोबत काम करणारे पर्यावरण प्रेमी सह्याद्री देवराई प्रकल्पासाठी काम करत आहेत.