सेक्रेड गेम्सचा दुसरा भाग निराशाजनक, सैफ अली खानची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेक्रेड गेम्सचा पहिला भाग हा जबरदस्त हिट झाला होता. त्यामुळे चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. 15 ऑगस्टला दुसरा सिझन रिलीज झाला. मात्र तो नेटकऱ्यांच्या उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. अनेकांचा भ्रमनिरास झाल्यामुळे नेटकऱ्यांनी सेक्रेड गेम्स व त्यातील कलाकारांना जबरदस्त ट्रोल केले.

चाहत्यांनंतर आता खुद्द सेक्रेड गेम्समधील मुख्य अभिनेता सैफ अली खान याने देखील दुसरा सिझन निराशाजनक असल्याची कबुली दिली आहे. त्याचा आगामी चित्रपट लाल कप्तानच्या प्रमोशनच्यावेळी एका मुलाखतीत त्याने ही कबूली दिली आहे. तसेच दुसऱ्या सिझनचा शेवट हा योग्य प्रकारे झाला नसल्याने कदाचित तो तितका प्रभावी ठरला नाही, असे देखील त्याने म्हटले आहे.

sacred-games-2-new

‘सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन अप्रतिम होता. आम्ही केलेली ती सर्वोत्तम कलाकृती होती. एमी पुरस्कारासाठी त्या सिझनला नामांकन मिळाले होते. मात्र दुसऱ्या सिझनने निराशा केली. दुसऱ्या सिझनची सुरुवात चांगली झाली मात्र क्लायमॅक्स तितकासा जमला नाही. काही गोष्टी मिळत्या जुळत्या नव्हत्या. त्यामुळे लोकांची देखील नाळ जुळली नाही’, असे त्याने सांगितले.