
देवगड बंदरात मच्छीमारी नौकांवर खलाशी म्हणून कामासाठी येणाऱया कामगारांनी ई पास घेऊन या परिसरात आल्यानंतर त्यांची योग्य ती आरोग्य तपासणी, करून 14 दिवस त्यांना क्वारंटाइन रहावे लागणार आहे .या कालावधीत संबंधित खलाशी अन्य परिसरात बाजारपेठेत फिरतं असताना आढळून आल्यास व तशी तक्रार आल्यास खलाशी व त्यांच्या नौका मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती देवगड जामसंडेच्या नगराध्यक्ष प्रणाली माने यांनी बैठकीत दिली यावेळी न.प. मुख्यधिकारी कौस्तुभ गव्हाणे, तसेच मच्छिमार संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मच्छीमारी बंदी कालावधी संपल्यानंतर मच्छिमार हंगाम सुरू होणार आहे सुमारे 2 हजार खलाशी. कामगार म्हणून नौकांवर कार्यरत असतात. कोरोना संक्रमण पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी या बाबत शासन प्रशासनाच्या आदेशा नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे आवाहनही नगराध्यक्ष प्रणाली माने यांनी केले आहे. त्याचबरोबर मालवण येथील नौका देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. त्या नौकांवरील खलाशी यांचे आरोग्य तपासणी, स्वाब घेऊन त्याना मालवण येथे 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून नंतरच देवगड बंदरात पाठविण्यात यावे अशा सूचना ही मच्छिमार फेडररेशनला नगराध्यक्ष माने यांनी दिली आहे.





























































