
सामना प्रतिनिधी । ओडेनसे
हिंदुस्थानची ‘शटलक्वीन’ सायना नेहवाल हिने तब्बल चार वर्षांनंतर जपानच्या अकाने यामागुचीला हरवण्याची करामत करून दाखवली. हिंदुस्थानच्या अनुभवी खेळाडूने जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असलेल्या अकाने यामागुचीला 21-15, 21-17 अशा फरकाने हरवत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
Great to b on the winning side against the world number 2 from japan #AkaneYamaguchi 21-15 and 21-17 ….#DenmarkOpen2018 pic.twitter.com/8Pwp5KFhQi
— Saina Nehwal (@NSaina) October 18, 2018
ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलेल्या सायना नेहवालने अवघ्या 36 मिनिटांमध्ये विजय मिळवला. सायना नेहवालने याआधी 2014 साली चायना ओपनमध्ये अकाने यामागुचीला हरवले होते. या वर्षी उबेर कप व मलेशिया ओपनमध्येही अकाने यामागुचीने बाजी मारली होती. आता उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सायना नेहवालसमोर जपानच्याच नोझोमी ओकुहरा हिचे आव्हान असणार आहे. दरम्यान, समीर वर्माने पुरुष एकेरीत आणि अश्विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांनी दुहेरी घोडदौड केली.




























































