
>> ज्योत्स्ना गाडगीळ
ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी ही अनुभवली पाहिजे. हीच अनुभूती घेण्याचा आणि देण्याचा सोहळा म्हणजे ‘ज्ञानेश्वरी चातुर्मास प्रवचन.’ वारकरी संप्रदायात अग्रणी नाव असलेले देगलूरकर घराणे पंढरपुरात 200 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालवत आहेत. नुकतीच या चातुर्मास सोहळय़ाची सांगता झाली. ही प्रवचन परंपरा आणि निरुपणाचे महत्त्व सांगणारा हा लेख.
माऊलींच्या ज्ञानेश्वरीत मनुष्याच्या जगण्याचे सार एकवटले आहे. म्हणून नामदेव महाराज आग्रह धरतात,
‘नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी.’
इथे त्यांनी ‘वाचावी’ असे न म्हणता ‘अनुभवावी’ असे म्हटले आहे. वाचलेली गोष्ट कदाचित विस्मरणात जाऊ शकते, परंतु अनुभवलेली गोष्ट कायम लक्षात राहते. म्हणून ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी ही अनुभवली पाहिजे.
हीच अनुभूती घेण्याचा आणि देण्याचा सोहळा म्हणजे ‘ज्ञानेश्वरी चातुर्मास प्रवचन.’ वारकरी संप्रदायात अग्रणी नाव असलेले देगलूरकर घराणे पंढरपुरात 200 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालवत आहेत. संत गुंडा महाराजांचे वंशज ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी अलीकडेच यंदाच्या चातुर्मास सोहळ्याची सांगता केली.
ज्ञानेश्वरी प्रवचनाची परंपरा कशी सुरू झाली याबद्दल ह.भ.प. अक्षय महाराज भोसले सांगतात, ‘देवनाथ महाराज नावाचे एक संत होते. त्यांना माऊलींच्या दर्शनाचा ध्यास लागला होता. त्यांनी आळंदीत येऊन हजारो पारायणे केली, पण माऊलींचे दर्शन घडले नाही. ‘ज्या जिभेने पारायणे करूनही माऊलींचे दर्शन घडत नाही, त्या जिव्हेचे अस्तित्वच नको’, असे म्हणत देवनाथ महाराजांनी आपली जिव्हा कापून इंद्रायणीत फेकली तोच माऊलींनी दर्शन देऊन योगमायेने जिव्हा पूर्ववत जोडली. कृतकृत्य झालेल्या देवनाथ महाराजांनी तिथून पुढे ज्ञानेश्वरी वाचनात कधीच खंड पडू दिला नाही. महाराजांची परंपरा त्यांचे विद्वान शिष्य चुडामणी महाराज यांनी सुरू ठेवली आणि चुडामणी महाराजांनी आपले जीवनकार्य संपवण्याआधी गुंडा महाराज देगलूरकर यांच्याकडे ही परंपरा सोपवली. आषाढी ते कार्तिकी एकादशी पंढरपुरात राहून ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे, असा नेम त्यांनी आखून दिला.’
संत गुंडा महाराजांचे वंशज धुंडा महाराज हे गृहस्थाश्रमी संत होते. प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय त्यांनी साधला. जोग महाराज व सोनोपंत दांडेकर या संतांचा सत्संगही त्यांना लाभला. भेदभाक न मानणारा नितळ स्कभाक, रसाळ व प्रासादिक वाणी, गतिमान व प्रभावी निवेदनशैली, क्युत्पन्नता यांचा सुंदर मिलाफ म्हणजे त्यांची कीर्तन. सामाजिक मनाला स्पर्श करणारी, कुरकाळकारी, सहज-सोपी भाषा ते वापरत असत. विद्वानांनी, प्राध्यापकांनी, साहित्यिकांनी, विचारकतांनी प्रशंसा केलेला त्यांचा ग्रंथ- ज्ञानेश्वारामचे पसायदान. त्यांच्या या ज्ञानेश्वर उपासनेबद्दल व प्रकटनाबद्दल पुणे विद्यापीठाने त्यांचा विशेष गौरव केला.
धुंडा महाराजांचे पंढरपुरातील ज्ञानेश्वरी चातुर्मास पारायण ही श्रोत्यांसाठी पर्वणी असे. महाराजांच्या निरुपणाच्या ज्ञानगंगेत डुबकी मारण्यासाठी चार महिने पंढरपुरात मुक्कामी राहत असत. त्यांचे निरुपण म्हणजे गीता, भागवत, उपनिषद, संतगाथा, रामायण -महाभारत, वेद, वाङ्मयाचा अर्क असे. अशी ज्ञानरिता त्यांच्या मुखातून 70 वर्षे अखंडपणे प्रवाहित होत राहिली. धुंडा महाराजांचे चिरंजीव ह.भ.प. भानुदास महाराज यांनी ती परंपरा पुढे नेली आणि आता धुंडा महाराजांचे नातू ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर ती परंपरा पुढे नेत आहेत. तेदेखील तरुण पिढीतील नामकंत कीर्तनकार आहेत. तसेच संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत. ‘ज्ञानेश्करी आणि कश्मिरी शैक दर्शन’ या विषयावर ते पुणे विद्यापीठातून पीएच.डी.साठी प्रबंधलेखन करत आहेत. पुण्यातील सर परशुराम महविद्यालय येथे 2 वर्षे व्याख्याते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. वर्षभर त्यांची ठिकठिकाणी कीर्तन, प्रवचन, लेखनसेवा सुरू असते. मात्र आषाढी ते कार्तिकी एकादशी त्यांचा पंढरपुरात मुक्काम ठरलेला असतो. शे-चारशे लोकांची बैठक व्यवस्था असलेल्या सभागृहात चैतन्य महाराजांच्या प्रवचनाला रोज हजारोंच्या संख्येने गर्दी होते. त्यात नामवंत व्याख्याते, लेखक, कवी यांचाही समावेश असतो. प्रा. राम शेवाळकर, प्रा. शिवाजीराव भोसले यांसारख्या दिग्गजांनीदेखील त्यांच्या निरुपणाचा लाभ घेतला आहे.
‘ज्ञानेश्करीचा अर्थ कळत नसला तरी ती वाचाकी. कारण ती वाचल्याने जो भाव तयार होतो त्या भावाला भुलते ती ज्ञानेश्वरी माऊली आणि मग आपल्या भक्ताला अर्थ समजून देण्याची जबाबदारीही माऊली घेते. संतकाङ्मय आपल्याला जीवनाचे व्यावस्थापन शिकवते. अशा संतवाङ्मयाची कास सोडू नये.’ असे चैतन्य महाराज सांगतात.
[email protected]






























































