
राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना ईदपूर्वीच एप्रिल महिन्याचा पगार मिळणार आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आदेश जारी केले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याचा पगार शिक्षकांना 25 एप्रिलपूर्वी दिला जाणार आहे.
रमजान ईद 3 मे रोजी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांचे एप्रिल महिन्यातील वेतन ईदपूर्वी करणाची मागणी शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली होती. त्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हे आदेश जारी केले आहेत.
राज्यातील शाळांना 3 मेपूर्वीच उन्हाळी सुट्टी सुरू होत असून त्यापूर्वी इतर शिक्षकही आपल्या गावी जाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे शिक्षण विभागाने रमजान ईदपूर्वी वेतन दिले जावे अशी मागणी करणारे निवेदन संघटनेकडून देण्यात आले होते.




























































