सलमान अलीचे मराठीत पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन आयडलच्या दहाव्या सिजनचा विजेता पार्श्वगायक सलमान अली याने ‘मजनू’ या चित्रपटासाठी प्रथमच मराठीत पार्श्वगायन केले आहे. ‘मन बांधलं बांधलं, तुझ्या नावाचं तोरण’ असे गाण्याचे बोल आहेत. गीतकार गोवर्धन दोलताडे असून हे गीत पी. शंकरम् यांनी संगीतबद्ध केले आहे. अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री श्वेतलाना अहिरे यांच्यावर नाशिक येथील कळवण, सापुतारा अशा नयनरम्य परिसरात चित्रित झाले आहे. नृत्यदिग्दर्शक साऊथचे हाईट मंजू हे आहेत. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित या चित्रपटात सस्पेन्स, ऍक्शन, रोमान्स तसेच लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील.