
बाॅलिवूडमध्ये सलमान खानची भाईजान म्हणून ओळख सर्वज्ञात आहे. आतापर्यंत सलमानने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. देशभरातील आणि जगभरातील चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. या सगळ्यात, लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सुपरस्टारला गेल्या काही काळापासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. गेल्या वर्षी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर भाईजानच्या भोवतालची सुरक्षा वाढवण्यात आली होती. पण या वर्षीच्या ईदच्या दिवशी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
सलमान खान नेहमीप्रमाणे त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या बाल्कनीत आला होता. पण तो त्याच्या बाल्कनीच्या नव्याने बनवलेल्या बुलेटप्रूफ काचेच्या मागे उभा होता. हे केवळ त्याच्या चाहत्यांसाठीच नाही तर स्टारसाठीही नवीन होते. सलमानने त्याच्या बाल्कनीला बुलेटप्रुफ काच का लावली याबाबत आता मौन सोडले आहे.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, सलमान खानने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ करण्याचे कारण सांगितले. त्याने खुलासा केला की, “ते इतर कोणत्याही कारणासाठी नव्हते. कधीकधी बाल्कनीत एखादा चाहता सकाळी झोपलेला आढळायचा. अनेकदा चाहते वर चढून बाल्कनीत झोपायचे, म्हणून आम्हाला ती जागा काचेने बंद करावी लागली.”
सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, सलमान खानने अलीकडेच त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ बद्दल सांगितले होते.